शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लाखो यात्रेकरूंसाठी नळाद्वारे पुसेगाव येथे शुद्ध पाणी : ग्रामपंचायत सज्ज -पुसेगाव यात्रा 2017

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:33 IST

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सवानिमित्त पुसेगाव येथे शनिवारपासून सुरू होत असलेल्या यात्रेसाठी येणाºया भाविक, दुकानदारांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे.

ठळक मुद्देसरपंच, उपसरपंचांनी घेतला तयारीचा आढावा; जादा कर्मचाºयांची नेमणूक- पुसेगावात आज रंगणार कुस्त्यांचा जंगी आखाडा

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सवानिमित्त पुसेगाव येथे शनिवारपासून सुरू होत असलेल्या यात्रेसाठी येणाºया भाविक, दुकानदारांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे. यात्रेकरूंना जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शुद्ध व मुबलक पाणी देण्यात येणार आहे,’ अशी माहिती सरपंच दीपाली मुळे व उपसरपंच रणधीर जाधव यांनी दिली.

यात्रा काळात भाविक, दुकानदार, बैलबाजार, कृषीप्रदर्शन व ग्रामस्थांना जलशुद्धीकरणाद्वारे मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. यासाठी नेर तलावातील दोन, काटकरवाडी येथील एक व जुनी वॉटर सप्लायची एक विहिरीद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. बैलबाजार वगळता इतरत्र नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे.बैल बाजारात काही ठिकाणी स्थानिक शेतकºयांच्या सहकार्याने जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित भागात पाणी देण्यासाठी टँकरचे नियोजन केले आहे.

आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार गावातील हातपंप शुद्धीकरण केले आहेत. नळपाणी पुरवठा व व्हॉल्व गळती काढली आहे. वीज वितरणने चोवीस तास वीज देण्याचे मान्य केले आहे. यामुळे यात्रेकरूंना वेळेत पाणी देणे शक्य होणार आहे. अडचणीच्या काळात जादा वीजपंपाची सोय करणार आहे. पाणी पुरवठ्यासाठी जादा कर्मचारी नेमले आहेत,’ अशी माहिती सरपंच मुळे, उपसरपंच जाधव, ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे यांनी दिली.नियंत्रण कक्षयात्रा काळात गटारांवर दोनदा औषध फवारणी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच धुराची फवारणी केली आहे. ठिकठिकाणी नवीन एलईडी बल्ब तसेच सौरदिवे लावले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये महसूल विभागातर्फे प्रशासकीय यंत्रणेसाठी नियंत्रण कक्ष स्थापना केला आहे. तेथून यात्रेचे नियोजन केले जाणार आहे. ग्रामपंचायत, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पोलिस यंत्रणा तसेच आरोग्य विभागातर्फे यात्रा काळातील योग्य ते नियोजन केले आहेव्हॉलीबॉल स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या अरुण शर्मा संघ विजेतापुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथे आयोजित अखिल भारतीय दिवसरात्र शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघावर मात करत उत्तर प्रदेशच्या अरुण शर्मा संघाने नेत्रदीपक खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला.

येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाले.

अंतिम सामना उत्तर प्रदेशच्या अरुण शर्मा संघ व सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघ (अस्लम) यांच्यात झाला. यात उत्तर प्रदेश संघाने विजय मिळवत श्री सेवागिरी चषकासह प्रथम क्रमांकाचे बक्षिस श्री सेवागिरी स्मृतिचिन्ह व २५ हजारांचे बक्षिस पटकाविले. द्वितीय क्रमांक सोलापूरच्या अस्लम व्हॉलीबॉल संघाने १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक मालेगाव येथील इस्तियाक व्हॉलीबॉल संघाने दहा हजार रुपये, चतुर्थ क्रमांक मालेगाव येथील व्हॉलीबॉल संघ पाच रुपये, पाच ते आठ क्रमांकासाठी दोन हजारांचे बक्षिस अनुक्रमे आयसीसी मालेगाव, सहावा क्रमांक पंजाब खली, हरियाना सुरेश व्हॉलीबॉल संघ, सोलापूरचा जयंत व्हॉलीबॉल संघाने मिळवले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. स्पर्धेत वीस संघांनी सहभाग घेतला.

पंच नंदकुमार भोईटे, आबा गायकवाड, जावेद मनोरे, विजय कोकीळ, जयप्रकाश दिल्ली फेडरेशन यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरत जाधव, जे. टी. जाधव, विजयसिंह जाधव, दीपक जाधव, मंगेश जाधव, अशोक जाधव, सुनील जाधव, विजय द. जाधव, संजय जाधव, शंकर शेडगे, निखील जाधव, रवी देशमुख, उत्तम सावंत, मयूर हिंगमिरे, मयूर विधाते, सचिन जाधव, राजू तारळकर यांच्यासह प्रशासनाने परिश्रम घेतले.पुसेगावात आज रंगणार कुस्त्यांचा जंगी आखाडापुसेगाव : ‘श्री सेवागिरी महाराजांचे पुण्यस्मरण व नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे शनिवार, दि. १६ रोजी दुपारी दोनला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे,’ अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.

शासकीय विद्यानिकेतनच्या शेजारील आखाड्यात आंतरराष्टÑीय कुस्ती केंद्र आंबेगाव पुणे येथील काका पवारांचा पठ्ठा कौतुक ढाफळे व कर्नाटक केसरी दावणगिरीचा कौतुक काटे, पुणे येथील आं. रा. कुस्ती केंद्राचा गणेश जगताप व कोल्हापूरच्या शाहूपुरी तालीम संतोष दोरवड, न्यू मोतिबाग तालीम कोल्हापूरचा बालारफिक शेख व ज्ञानेश्वर गोचडे, गंगावेश तालीम कोल्हापूरचा योगेश बोंबाळे व पुणे येथील आं. रा. कुस्ती केंद्राचा अतुल पाटील, पुणे येथील आंतरराष्टÑीय कुस्ती केंद्राचा पोपट घोडके विरुद्ध कोल्हापूरच्या मोतिबाग तालिमचा अमोल फडतरे, गोकुळ आवारे विरुद्ध विजय धुमाळ, संदीप काळे विरुद्ध नाथा पालवे यासह अनेक नामांकित पैलवानांच्यातील रोमहर्षक लढती पाहायला मिळणार आहेत.

पंच म्हणून मेजर कृष्णात जाधव, सुभाष माने, मोहन जाधव, दिल्लीतील सेनादलाती कुस्ती प्रशिक्षक हणमंतराव गायकवाड, विकास जाधव, श्रीमंत जाधव, अण्णा साप, नितीन राजगे, राजेंद्र कणसे, मधुकर शिंदे, अधिक जाधव, तानाजी मांडवे हे काम पाहणार आहेत.शंभर रुपयांपासून पाच हजार रुपये बक्षिसापर्यंतच्या पैलवानांनी जोड्या सकाळी ९ ते १२ यावेळेत कुस्ती आखाड्यात नोंद कराव्यात.

मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, उपसरपंच रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत दुपारी एकला कुस्त्याचा इनाम सेवागिरी मंदिरातून वाजत गाजत आखाड्यात नेण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाSatara areaसातारा परिसर